अशिक्षित गंगाबाईची दोन साथीदारांसहित कोठडीत रवानगी , एक कोटींसाठी चक्क..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली होती आपल्या पतीचा एक कोटी रुपयांचा विमा आहे ही माहिती समजल्यानंतर एका महिलेने दोन जणांना हाताशी घेत पतीची हत्या केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पिंपळगव्हाण येथे 11 जून रोजी उघडकीला आला होता. सदर घटना घडल्यानंतर पत्नी आणि तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या त्यांना न्यायालयाने 24 जून रोजी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

आपला नवरा मयत झाला तर त्याचा एक कोटी रुपयांचा विमा आपल्याला मिळेल या आशेने एका महिलेने चक्क सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणली आणि अपघात झालेला आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला होता मात्र या महिलेला जेरबंद करण्यात आलेले असून तिला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या आणखी दोन जणांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गंगाबाई मंचक पवार ( वय 37 मूळ राहणार लातूर सध्या राहणार बीड ) असे या महिलेचे नाव असून तिला मदत करणारे श्रीकृष्ण सखाराम बागलाने ( वय 27 राहणार काकडहिरा तालुका बीड ) व सोमेश्वर वैजिनाथ गव्हाणे ( वय 47 राहणार पारगाव शिरस तालुका बीड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर मास्टरमाइंड गंगाबाई ही चक्क अशिक्षित असल्याचे आढळून आले आहे

बीड- नगर रस्त्यावर म्हसोबा फाट्याजवळ 11 जून रोजी मंचक पवार यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी मात्र अपघात झाल्यासारखे कुठलेही पुरावे आढळून आले नाहीत तसेच नातेवाईकांनी देखील पत्नीवर संशय व्यक्त केल्याने हा प्रकार घातपात नसावा अशी शक्यता पोलिसांना वाटली आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपासाला सुरुवात केली.

तपास सुरू असताना मंचक पवार यांच्या नावाने एक कोटी रुपयांचा विमा होता आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हा विमा त्यांची पत्नी गंगाबाई तिला मिळणार होता असे समोर आल्यानंतर तपासात गंगाबाई हिनेच पतीला मारण्याकरता दहा लाख रुपयांची सुपारी दिली आणि त्यात दोन लाख रुपये ईसार देखील दिला होता अशी बाब समोर आली. पकडलेल्या आरोपींना 13 जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगितलेले आहे. सदर गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरार होते मात्र त्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.