पुणे हादरलं..आयटी कंपनीच्या सिनियरने तरुणीला फोन केला अन म्हणाला..

शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे इथे एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून एक तरुणी काम करत असलेल्या आयटी कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला घरी नेले आणि दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्याने या प्रकाराचे फोटो काढले आणि 10 जून रोजी पुन्हा एकदा तिला आपल्या घरी नेऊन तिच्यासोबत तोच प्रकार केला. संतप्त तरुणीने पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून बावधन येथे हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अभिनव दिलीपकुमार शांडिल्य ( राहणार बावधन मुळ बिहार ) असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत . हिंजवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पीडित तरुणीने म्हटल्याप्रमाणे फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. आरोपी हा फिर्यादी तरुणीचा सिनियर असून त्याने जबरदस्तीने पीडित तरुणीला त्याच्या घरी नेले होते.

घरी गेल्यानंतर त्याने तरुणीला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकाराचा त्याने व्हिडीओ बनवला आणि त्याच्या आधारे ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन पुन्हा फोन करून तिला घरी बोलावून घेतले आणि पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्याने याच हेतूने तिला फोन केला मात्र तरुणीने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला बेड्या ठोकलेल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.