नगर ब्रेकिंग..’ हॅकसा बेल्ड ‘ अन ऍक्टिव्हा गाडी , राणी अखेर धरलीच

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना उघडकीला येत असताना आपल्या चमत्कारिक कौशल्याने हॅकसा बेल्डने कुलूप कापून चोरी करणाऱ्या एका महिलेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. सदर महिला ही तिची एक्टिवा गाडी वापरून चोरी करायची आणि त्यानंतर फरार व्हायची . आरोपी महिलेला पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले असून राणी महादेव भोसले ( राहणार गजानन नगर श्रीगोंदा ) असे या महिलेचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील एका वकिलाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. घरातील सोन्याचे दागिने आणि चांदीचे पैंजण गायब झाल्यानंतर पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना ही महिला आढळून आल्यावर तिची ओळख पटवण्यात आली आणि अवघ्या काही तासांच्या आत तिला बेड्या ठोकण्यात आल्या.

संशयित आरोपी रानी हिने घरफोडी केल्याची कबुली दिली असून तिने गुन्ह्यांमध्ये वापरलेली सुमारे 25 हजार रुपये किमतीची एक्टिवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.