दहावीतील यशाबद्दल निकहत पठाण हिचा हाजी अन्वर खान यांच्या हस्ते सत्कार

हजरत मिरावली पहाड दर्गाचे वंशावळ विश्वस्त ट्रस्टी आसिफखान पीरखान पठाण यांची कन्या निकहत आसिफ खान पठाण हिने इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा हाजी अन्वर खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हाजी अन्वर खान यांनी याप्रसंगी तिचे अभिनंदन करून पुढील करिअरसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

हाजी अन्वर खान यांनी निकहत पठाण हिचे कौतुक करताना म्हटले आहे की, ‘ आज दहावीपासून तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलीच बाजी मारत आहेत. मुलींची सर्वच क्षेत्रातील भरारी कौतुकास्पद अशीच राहिलेली आहे. मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्यादेखील यशाचे शिखर गाठतात हे यातून सिद्ध होत आहे. कुमारी निकहत हिने अत्यंत मेहनतीने हे यश मिळवलेले आहे. तिची जिद्द आणि चिकाटी पाहता पुढील शिक्षणात देखील ती उत्तुंग भरारी घेईल,’ असे म्हटले आहे.

सदर कार्यक्रमाच्या वेळी आसिफखान पीरखान पठाण, इंजिनीयर इमरान खान, सायर पठाण, अर्शद पठाण, कुमारी मशिरा पठाण, मोईन पठाण, कुमारी सिमीनरीजा व कुमारी इरम फातिमा खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्वांनी निकहत हिच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर आसिफ खान पठाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आहेत.