तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ?, आदित्य ठाकरे यांनी सांगितली पडद्यामागील गोष्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी त्यानंतर नाटक करत ‘ असे झाले तसे झाले ‘ असे सांगितले आणि अचानकपणे 20 जून रोजी त्यांनी बंड केले, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.

सांताक्रूझ येथे युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ त्यांनी बंड पुकारल्यानंतर मिळवलेला सर्व मानसन्मान गमावलेला आहे. काल व्हिडिओ व्हायरल झाला तो तुम्ही पाहिला असेल. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू न देणे हे माझे काम आहे. आता घाण साफ झाली आहे फुटीरवादी लोक शिवसेनेत नको आहेत त्यामुळे त्यांना माफ केले जाणार नाही.

बंडखोरीनंतर शिवसेनेला बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्र्याचे प्रत्येकावर बारीक लक्ष असते. त्यांनी सर्वांना न्याय दिला मात्र या बंडखोरांना आज अशी परिस्थिती झाली की त्यांना आरशात पाहायला देखील लाज वाटते. बंड करायचे होते तर तुम्ही मुंबईत बंड करायचे. सुरतला पळून जाण्याची गरज नव्हती. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. तुम्हाला पळून जाणे शोभत नाही, इथे येऊन काय ते बोला..’, असेही ते पुढे म्हणाले.