‘ काय झाडी काय डोंगार काय हाटील ‘ , ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत आमदार गुवाहाटीतच राहणार ?

महाराष्ट्रातील राजकीय घमासनात सर्वोच्च न्यायालयात पोहचलेल्या लढाईत शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालेला असून सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना कारवाईपासून 11 जुलैपर्यंत दिलासा देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळलेली आहे. आता शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना दिलं जाण्याची शक्यता आहे तर भाजपमध्ये देखील हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे मात्र या आमदारांचा मुक्काम आता ११ जुलैपर्यंत गुवाहाटी इथेच राहण्याचे संकेत आहेत.

आम्ही आमच्या कामात आहोत. सत्ताबदलाच्या प्रयत्नात आम्ही नाही. आताही आम्ही आमच्या एका राष्ट्रीय कमिटीच्या बैठकीत जात आहोत. तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांना काय उत्तर द्यायचं, काय कारवाई करायची आणि त्याला शिंदे गटातून काय उत्तर दिलं जातं हा त्यांचा मुद्दा आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात भाजपचा कुठेही सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय घमासान सुरू असून शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शंका फेटाळून लावत आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून महाविकास आघाडी राज्यात कायम राहील, असे स्पष्ट केले आहे तसेच संख्याबळ असले तर शिंदे गटाने मुंबईत यावे असे देखील आव्हान शरद पवार यांनी केलेले आहे.

अभिनेते किरण माने यांनी देखील या प्रकरणावर एक फेसबुक पोस्ट केलेली असून , “काय स्पीड हाय राव…आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ ला सुनावणी ठरवलीसुद्धा…निकालच लावून टाकायचा ना थेट…जय सुप्रीम कोर्ट.” असे म्हटले आहे.

राजकीय मुद्द्यांवर अभिनेते किरण माने नेहमीच आपलं मत मांडताना दिसतात मात्र अनेकदा स्पष्ट वक्तव्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र आपलं मत ते स्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचवतात. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत देखील याआधीही किरण यांनी पोस्ट शेअर केली होती. आता देखील त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर आपलं मत व्यक्त केलं असून सोशल मीडियावर बंडापाठीमागे भाजपचा हात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.