म्हैसाळच्या ‘ त्या ‘ कुटुंबाची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड , आणखी दोन जण ताब्यात

सांगली जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीला आला होता. म्हैसाळ येथील नऊ जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला हा प्रकार कर्जबाजारी झाल्याने घडल्याचे समोर आले मात्र त्यानंतर यामध्ये काळी जादू आणि मांत्रिक याचा अँगल समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि आणि अखेर हा तपास या नऊ जणांचा खून केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा या प्रकरणात पोलीस दलाने चोख कामगिरी बजावत आणखी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

आब्बास महंमदअली बागवान (वय ४८, रा. मुस्लीम बाशा पेठ, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (३०, रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी परिसरातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली होती मात्र आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले डॉक्टर माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक असलेले भाऊ पोपट वनमोरे यांनी बुवाबाजी आणि तंत्र मंत्र याचा आधार घेत म्हैसाळमधील जुन्या स्वयंपाकघरात गुप्तधन आहे आणि ते काढण्यासाठी विधी करावे लागतील असे एका मांत्रिकाचे ऐकले होते आणि त्यातून त्यांनी हा खर्च करण्याचे ठरवले. सोलापूर जिल्ह्यातील एका मांत्रिकाशी त्यांनी सुरुवातीला संपर्क केला आणि त्यानंतर तासगाव येथील एक मांत्रिक देखील यात सहभागी असल्याची चर्चा होती .

दोन्ही मांत्रिकानी वनमोरे कुटुंबीयांना आपल्या जाळ्यात ओढले आणि गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे कुटुंबीय यांनी सुरुवातीला स्वतःच्या जवळील असलेले पैसे मांत्रिकाच्या घशात घातले. मांत्रिकाची पैशाची हव्यास कमी होत नसल्याने त्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने देखील विकले मात्र अखेर त्यांनी परिसरातील पतसंस्था आणि खाजगी सावकार यांच्या कडून देखील कर्ज घेतले आणि या मांत्रिकाचे खिसे भरले मात्र अखेर मांत्रिकाने हे गुप्तधन काढणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे असे सांगत दुसऱ्या एका ‘ पॉवरबाज ‘ मांत्रिकाची वनमोरे कुटुंबीय यांच्याशी भेट घालून दिली होती मात्र तरीही अपयश आले आणि अखेर कुटुंबातील सर्वांचे मृतदेह एका दिवशी आढळून आले .

माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले माणिक हे कुटुंबासहित अंबिकानगर इथे वास्तव्यास होते मात्र सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता तसेच दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता . मात्र अखेर हा कुणी असल्याचे समोर आले असून सर्व जेवणातून विष दिले गेल्याचा अंदाज आहे .