‘ फॅक्ट चेक ‘ ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ‘ त्या ‘ पत्रकाराला अटक

शेअर करा

केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत आणि खोट्या बातम्या पसरवल्यानंतर त्याची सत्यता उघड करणारे अल्ट न्यूजचे संस्थापक असलेले पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मोहम्मद जुबेर यांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती.

अल्ट न्यूज ही फॅक्ट चेकिंग वेबसाईट असून त्यामध्ये अनेकदा माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्यांची वस्तुस्थिती तपासून त्यातील सत्यता लोकांसमोर मांडण्यात येते मात्र यामुळे व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींची मोठी गोची होत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून ही वेबसाईट आणि त्यात काम करणारे पत्रकार हे त्यांच्या निशाण्यावर आहेत त्यामुळे मोहम्मद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावून द्वेषाला खतपाणी घातले असा ठपका ठेवत ही अटक केली गेली आहे.

मोहम्मद जुबेर यांनी सवंग लोकप्रियतेसाठी धार्मिक भावना दुखावल्या असा दिल्ली पोलिसांनी दावा केला होता आणि त्यांना पाच दिवसांसाठी पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एडिटर गिल्ड ऑफ इंडिया तसेच अनेक मानवाधिकार संघटना, सामाजिक संघटना आणि ऑनलाईन क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांनी देखील याप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ त्यांची मुक्तता करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


शेअर करा