नगर ब्रेकिंग..आणखी हजार दे तरच वारस नोंद लावते , महिला तलाठी जाळ्यात

शेअर करा

सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचार हा काही कमी होण्याचे नाव घेत नाही अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात उघडकीला आलेली असून वारस नोंद लावण्यासाठी एका तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पारनेर तालुक्यातील तिखोल येथील तलाठी लता एकनाथ निकाळजे हिला किन्ही इथे रंगेहात पकडण्यात आलेले आहे. अवघ्या एक हजारांसाठी तिने तक्रारदार यांची वारस नोंद थांबवली होती.

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हा 33 वर्षीय असून तिखोल गावातील आजोबा आणि वडिलांच्या नावावर असलेली जागा वारसाहक्काने त्यांची आजी, भाऊ आणि आणि त्यांच्या नावावर करण्यात यावी यासाठी त्यांनी महसूल दप्तरी नोंद करावी म्हणून अर्ज केला होता मात्र अर्ज दाखल केल्यानंतर तलाठी पदावर कार्यरत असलेली लता ही नोंद घेण्यास टाळाटाळ करत होती त्यानंतर तिने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. संपूर्णपणे कायदेशीर योग्य बाजू असताना पैसे कशाला द्यायचे असा प्रश्न तक्रारदाराला पडला मात्र तरीही त्यांनी 1000 रुपये तिला दिले मात्र तरीदेखील आणखी एक हजार दिले तरच नोंद होईल अशी भूमिका तिने घेतली आणि त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला.

नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार लता निकाळजे हिला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि मंगळवारी तलाठी कार्यालयात एक हजार रुपयांची लाच घेत असताना तिला रंगेहाथ पकडण्यात आले, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोरडे, सापळा पथकातील पोलीस नाईक रमेश चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली असून त्यांच्या या कारवाईचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे.


शेअर करा