‘ शेठ एकदा एकांतात भेटू ना ‘ , भेटल्यावर वेगळाच प्रस्ताव ठेवला समोर

शेअर करा

स्मार्टफोन हाती आल्यानंतर सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे सोबतच हनी ट्रॅप हा एक नवीन गुन्हेगारीचा प्रकार पूर्ण देशात रुजू झालेला आहे अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात उघडकीला आलेले असून एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून आर्थिक रक्कम लुबाडल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून या महिलेने समोरच्या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढले होते.

उपलब्ध माहितीनुसार, मंगल हांजीगे, शिवानंद हांजीगे, बबलू हांजीगे रियाज मुल्ला अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे . शीतल ( काल्पनिक नाव ) हिच्यासोबत शहरातील एका व्यापाऱ्यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती त्यानंतर तिने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याला भेटायला बोलावले. त्यांच्याशी जवळीक निर्माण केल्यानंतर तिने या व्यापाऱ्याची आर्थिक लुबाडणूक सुरू केली आणि 2019 पासून तर 2022 पर्यंत अशा पद्धतीने तिने या व्यापाऱ्याला चांगलाच गंडा घातला.

वरील कालखंडात शीतलने एकदा या व्यापाऱ्याला भेटण्यासाठी म्हणून हातकणंगले येथे एका हॉटेलमध्ये बोलावले होते त्यावेळी शितल आणि तो व्यापारी एकांतात असताना वरील चार जण तिथे आले आणि त्यांना या व्यापाऱ्याला ‘ तिच्यासोबत प्रेम संबंध कायम ठेव मात्र तिची देखभाल कर आणि तिला घरी घेऊन जा नाहीतर तुझी बदनामी करु, ‘ अशी धमकी देत मारहाण केली. त्यानंतर या व्यापाऱ्याने हतबलता व्यक्त केल्यानंतर वरील चार जणांनी त्याच्यापुढे वेगळा प्रस्ताव ठेवला.

शितल आणि वरील चार जणांनी या व्यापाऱ्याला आता गुपचूप तू आम्हाला सात लाख रुपये देऊन टाक असे सांगत त्याला धमकावले नाहीतर त्याची बदनामी करण्याची धमकी दिली. व्यापाऱ्यांने त्यानंतर चार लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि दोनदा करत एकूण दोन लाख रुपये दिले. उरलेल्या पैशांसाठी त्यांच्याकडून सातत्याने तगादा होत असल्याने या व्यापार्‍याने पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी सापळा रचून या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या.


शेअर करा