‘ सोनोग्राफी मशीन सील करणार नाही मात्र..’, महिला डॉक्टरकडे महिला पोलिसांची ‘अजब ‘ मागणी

शेअर करा

पुणे येथे लाचखोरीचा एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून तुमच्या हॉस्पिटलमधील असलेली सोनोग्राफी मशीन सील करणार नाही आणि तुम्हाला तपासात सहकार्य करेल यासाठी एका महिला डॉक्टरकडे पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली आणि त्यातील दोन लाख घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला रंगेहात पकडण्यात आलेले आहे. निगडी येथे हा प्रकार तीस तारखेला उघडकीला आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला निवारण अत्याचार निवारण कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शंकर शिंदे या तपासासाठी पुणे येथे आलेल्या होत्या. एका 65 वर्षीय महिला डॉक्टरने याप्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. सिंधुदुर्ग येथील एका प्रकरणात तपासासाठी म्हणून त्या पुणे येथे आल्या आणि कारवाईमध्ये अडकल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत असलेल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांच्याकडे होता. या प्रकरणी तपासासाठी त्या आल्या असताना त्यांनी 65 वर्षीय महिला डॉक्टर यांची भेट घेतली आणि त्यांना तुमच्यावर कारवाई करावी लागेल असे सांगत कारवाई टाळायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील अशी त्यांनी मागणी केली आणि त्यातील पहिली इंस्टॉलमेंट दोन लाख घेताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई बद्दल लाचलुचपत विभागाचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे.


शेअर करा