महाराष्ट्र हादरला..पैशाअभावी घराला बाहेरून कुलूप लावून पती अन मुले गेली अन..

शेअर करा

कोरोना संकटानंतर अनेक नागरिकांचे अर्थचक्र बिघडलेले असून अद्यापही अनेक कुटुंबाची गाडी रुळावर आलेली नाही यातूनच एक दुर्दैवी घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून लॉकडाऊनच्या काळात घेतलेले कर्ज फेडण्यासाठी येत असलेल्या अपयशातून घरभाडे देखील थकले आणि सगळीकडून आर्थिक अडचण सुरू झाल्याने रोज दारात येणाऱ्या व्यक्तींना काय उत्तर देऊ ? या चिंतेने एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खोकडपुरा येथील बापूनगर येथे शुक्रवारी ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आशा चंपालाल तरटे ( वय 45 ) असे मयत महिलेचे नाव असून ही महिला पती दोन मुले आणि 13 वर्षीय मुलीसह बापूनगर येथे पतीसह राहत होती. तिचा पती भाजीपाला विक्रीचे काम करत असून कोरोना काळात या परिवाराची आर्थिक ससेहोलपट मोठ्या प्रमाणात झाली होती त्यामुळे त्यांनी काही व्यक्तींकडून हात उसने पैसे घेतले होते. अशाच पद्धतीने सुमारे तीन लाख रुपये कर्ज झाले आणि नंतर देखील म्हणावा असा उत्पन्नाचा स्रोत राहिला नाही आणि रोजच्या खाण्याची भ्रांत निर्माण झाली. अशातच दारात रोज पैशासाठी लोक येत असल्याने त्यांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता त्यात घरमालकाने देखील पैशासाठी तगादा लावल्याने कुटुंब हतबल झाले होते.

शुक्रवारी नेहमीप्रमाणे पैसे मागण्यासाठी लोक येत असल्याने आईला घरात ठेवून दाराला बाहेरून कुलूप लावून पती आणि मुले कामावर गेली आणि मुलगी शाळेत गेली होती. ती शाळेतून आली आणि तिने बाहेरून दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा आईने गळफास घेतल्याचे तिच्या लक्षात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आलेली असून त्यात मयत महिला यांनी कर्जाचा डोंगर आणि घरभाडे थकले. त्यांना पैसे द्यावे लागतील म्हणून किती दिवस घरात लपून बसावे आता त्रास होत आहे असे लिहिलेले असून घटना उघडकीस आल्यावर परिसरात शोककळा पसरली आहे.


शेअर करा