नालेगावात डॉक्टर गावाला गेलेल्या समजताच ‘ डाव साधला ‘ , पोलिसांकडून शोध सुरु

शेअर करा

नगर शहरात गेल्या काही दिवसात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामध्ये प्रामुख्याने धूम स्टाईलने दागिने पळवणे याच्यासोबत बंद असलेली घरे हेरून घरफोडी करणे अशा घटनांचा समावेश आहे. अशीच एक घटना शहरातील नालेगाव येथे उघडकीला आलेले असून डॉक्टरांच्या बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरफोडी करत तब्बल दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर किर्ती गंधे ( राहणार हिरवे गल्ली नालेगाव ) असे फिर्यादीचे नाव असून गंधे या त्यांच्या मुलीसोबत आई-वडिलांना भेटण्यासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. त्यांच्या पतीचे जखणगाव येथे हॉस्पिटल असून घरी कोणीही नव्हते ही बाब चोरट्यांनी हेरली आणि त्यानंतर घरफोडी केली.

कीर्ती यांची मुलगी नगर येथे आलेली असताना तिने घराचा दरवाजा उघडा दिसल्याने आईला फोन केला आणि त्यानंतर त्यांची आई या देखील नगरला आल्या त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते आणि घरातील दागिन्यांची देखील चोरी झालेली होती असे समोर आले आहे . सदर प्रकरणी त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.


शेअर करा