ज्यांनी मोबाईल बनवला ते किती वेळ मोबाईल वापरतात माहीत आहे का ?

शेअर करा

मोबाईल फोन या संकल्पनेचे जनक असलेले मार्टिन कूपर यांना त्यांच्याच संशोधनाबद्दलच सध्या दुःख झालेले असून नागरिक गरजेपेक्षा जास्त मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले आहे की मोबाईल फोनवर आभासी जगात वेळ घालवण्यासाठी पेक्षा खरे जीवन जगा. मार्टिन कूपर यांचे सध्याचे वय 93 वर्ष असून मोबाईल संकल्पनेचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

स्वतः बद्दल बोलताना आपण चोवीस तासांपैकी आपण फक्त पाच टक्के वेळ मोबाईलवर घालवत आहोत असेही ते म्हणाले आहेत. मार्टिन कूपर हे 1970 च्या दशकात मोबाईल फोन बनवणाऱ्या मोटोरोला टीममध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. मोठ्या प्रमाणावर त्यांनी मोबाइलची संकल्पना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यात भूमिका बजावलेली आहे.

कुपर यांनी 3 एप्रिल 1973 रोजी जगातील पहिला मोबाईल कॉल केला होता आणि त्यांना कॉल करण्यासाठी मोबाईल बनवण्यासाठी तीन महिने लागले होते. त्यावेळी त्या मोबाईलची बॅटरी ही अवघी पंचवीस मिनिटे चालत होती आणि चार्जिंग करण्यासाठी मात्र दहा तास लागत होते आणि सोबतच प्रत्येकाला वेगवेगळे क्रमांक देण्याची कल्पनादेखील मार्टिन यांची होती.


शेअर करा