पुण्यात खळबळ..तरुणीचा गळा चिरून उसाच्या शेतातून पळणारा ‘ तो ‘ धरला

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात कुरकुंभ येथे समोर आलेली असून पुणे सोलापूर रस्त्यावरील मळद तलावाच्या समोर एका शेतात साडे सतरावर्षीय अल्पवयीन मुलीचा प्रेमातून गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले असून सदर प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, राहुल श्रीशैल निरजे ( वय 27 राहणार खटाव जिल्हा सांगली सध्या राहणार जिल्हा पुणे ) असे आरोपीचे नाव असून काही दिवसांपूर्वी तो एका कंपनीत कामाला होता. सदर युवती ही त्याची नातेवाईक असून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते असे त्याचे म्हणणे आहे. सकाळी तो तिला हडपसर येथील गाडी तळावरून घेऊन सोलापूरला जात असताना तलावाच्या समोर निर्जन असलेल्या उसाच्या शेतात जाताना काही जागरूक नागरिकांनी त्याला पाहिले मात्र त्यांनतर तो तिथून तो पळून जात होता तेव्हा ग्रामस्थांनी त्याला पकडले. त्याने मुलीचा गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले तर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदर घटना ही प्रेमसंबंधातून झालेली असल्याचे या युवकाचे म्हणणे असून मुलीच्या घरच्यांनी आपल्याला मागील दोन वर्षांपासून लग्नासाठी ताटकळत ठेवले आहे त्यामुळे संतापून आपण हे पाऊल उचलले असे त्याचे म्हणणे आहे. कुरकुंभचे सरपंच आयुब शेख, माजी उपसरपंच सुनिल पवार तसेच पोलीस हवालदार श्रीराम शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. ग्रामस्थांच्या जागरूकपणामुळे एका तरुणीचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.


शेअर करा