पुणे ब्रेकिंग..इंटेरिअर डिझायनर तरुणीला आमिष दाखवले अन ..

शेअर करा

पुणे परिसरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून इंटेरिअर डिझायनर असलेल्या एका तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर ऑगस्ट 2016 पासून तर 2022 पर्यंत सातत्याने अत्याचार केल्याचा प्रकार चिंचवड परिसरात उघडकीला आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सचिन रामकृष्ण पुंडे ( वय 35 राहणार चिंचवड ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून सदर प्रकरणी 30 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पीडित तरुणी ही इंटेरिअर डिझायनर असून सचिन पुंडे याच्यासोबत तिची ओळख झाली होती. मैत्रीचा फायदा घेत त्याने आपण लग्न करू असे सांगत तिला आपल्या जाळ्यात ओढले होते.

आपल्यासोबत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत त्याने आपल्याला अनेक वेळा लग्नाचे आमिष दाखवले आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या इच्छेच्या विरोधात परिसरातील अनेक लॉजवर घेऊन जात आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असे पीडित तरुणीचे म्हणणे असून सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीक्षा झडते या करत आहे.


शेअर करा