अखेर ‘ त्या ‘ अल्पवयीन मुलीची घरवापसी , प्रियकरासोबत पुण्यात थाटला होता संसार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून वडिलांसोबत बिगारी काम करणाऱ्या एका तरुणाने एका कुटुंबातील मुलीला फूस लावली आणि त्यानंतर त्याने तिला पळवून नेले. बीड शहरात 5 जुलै रोजी हा प्रकार उघडकीला आला असून अखेर या मुलीची घरवापसी करण्यात आली आहे..

उपलब्ध माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सदर मुलगी राहत असून तिचे वय 17 वर्षे आहे. मुलींचे वडील बांधकामावर काम करत असून त्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली जीवन रघुनाथ सरोदे ( वय 19 राहणार इंद्रप्रस्थ कॉलनी बीड ) हा काम करतो. कामाच्या निमित्ताने त्याचे मुलीच्या वडिलांच्या घरी येणे-जाणे होते आणि त्यातून जीवन याचे मुलीसोबत प्रेम संबंध जुळले. वडील घरी नसताना पुढील पाच महिने त्यांच्यामध्ये व्हाट्सअपवर बोलणे होत असायचे त्यानंतर हा प्रकार समोर आल्यावर मुलीच्या घरच्यांकडून त्याला आणि मुलीला समज देण्यात आली.

आपल्या प्रेमप्रकरणाला विरोध होतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने मुलीसोबत पळून जाण्याचा प्लॅन केला आणि 20 मे रोजी या मुलीसोबत पलायन केले. मुलगी घरी आढळून आल्याने मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आणि त्यानंतर पाच जुलै रोजी कारवाई करत सदर जोडपे हे पुणे येथे असल्याचे समजल्यावर त्यांना पुन्हा बीड येथे आणण्यात आले आहे. जीवन याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता . न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा