पुण्यात खळबळ..आई नगरसेविका अन सासू नगराध्यक्षा , सुनेने घेतला गळफास

शेअर करा

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आळंदीच्या नगराध्यक्षा असलेल्या वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही . प्रियांका अभिषेक उमरगेकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून प्राथमिक माहितीनुसार घरगुती किरकोळ वादातून हा प्रकार घडलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रियांका घोलप ( माहेरचे नाव ) आणि अभिषेक उमरगेकर यांचा 16 नोव्हेंबर 2021 रोजी विवाह झाला होता. प्रियंका आणि अभिषेक यांच्यात किरकोळ वाद झाला अन मी आता आत्महत्या करते अशी देखील प्रियांकाने धमकी दिली होती. त्यानंतर बेडरूमध्ये जाऊन 8 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलेले असून शहरात खळबळ उडालेली आहे.

आळंदी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये देखील तिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. प्रियांका ही पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका कमल घोलप यांची कन्या असून प्रियांकाच्या आत्महत्येने उमरगेकर आणि घोलप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.


शेअर करा