.. तर आम्हाला आपल्या घरातच राहावे लागेल..कोरोना कॉलर ट्यूनवर रोहित पवार यांचे ट्विट : पहा काय म्हणाले ?

शेअर करा

कोरोना कॉलर ट्यूनमुळे आता बरीच जागृती झालेली असल्याने ती बंद करण्यात येण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम केली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील अनेकदा महत्वाचे कॉल लागण्यास विलंब होत असल्याने ती बंद करावी असे सुचवले आहे . आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील कोरोना कॉलर ट्यूनवर नागरिकांची मते जाणून घेण्याच्या निमित्ताने या चर्चेत उडी घेतली आहे .

रोहित पवार यांनी ट्विट करून कॉलर ट्यूनबाबत नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यापैकी कितीजणांना करोनाची कॉलर ट्यून ऐच्छिक करायला हवी असं वाटतं?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित यांच्या या प्रश्नाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. या कॉलर ट्यूनचा वैताग आलाय. ती काढून टाकली पाहिजे, असं नेटिजन्सनी म्हटलं आहे. कॉलर ट्यूनला नागरिक देखील वैतागले असून एकीकडे अनलॉक अनलॉक म्हणत राहायचे तर मग कॉलर ट्यून हवीच कशाला ?. आता बऱ्यापैकी जनजागृती झालेली असल्याने कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केलेली आहे .

सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करोना कॉलर ट्यून काढण्याची मागणी केली होती. या कॉलर ट्यूनमुळे भीती पसरवली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तर राजस्थानचे काँग्रेसचे आमदार भरत सिंह यांनीही या कॉलर ट्यूनला आक्षेप घेतला होता. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी करोना विषाणूबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची विनंती केली होती.

मार्च महिन्यात सर्व मोबाईल धारकांवर सक्तीने थोपवलेली कोरोना कॉलर ट्यून आता ऑगस्ट संपत आलाय तरी जाईना. जनजागृतीच करायची तर इतर देखील पर्यायी मार्गांचा विचार करावा. अनेक वेळा काही अर्जेंट कॉल लागण्यास या कॉलर ट्युनमुळे विलंब तर होत आहेत मात्र नागरिकांमध्ये भीती देखील पसरत आहे त्यामुळे कॉलर ट्युन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.


शेअर करा