महाराष्ट्रात खळबळ..भाजप नेत्याच्या बेडरूमधील व्हिडीओ व्हायरल, महिला म्हणतेय की..

शेअर करा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी सोलापूर जिल्ह्यातुन समोर आलेली असून एका महिलेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ही महिला समोरील व्यक्तीने आपल्याला फसवले असून लग्न करतोय हा ? असा आरोप करत एका भाजपच्या त्या नेत्याकडे बोट दाखवत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हा भाजप नेता देखील बेडवर बसलेला स्पष्टपणे दिसून येत असून महिला व्हिडिओ काढत असल्याचे पाहून तो मध्ये येऊन तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेत असल्याचे देखील दिसून येत आहे.

आरोप करणारी महिला ही ‘ हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा ‘, असा आरोप करत आहे. सदर भाजप नेता हा सोलापूर जिल्ह्यातील मोठा नेता असून हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. ‘ पार्टी विथ डिफरन्स ‘ असा नारा घेऊन नागरिकांसमोर जाणारी भाजप आता काय उत्तर देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ या देखील सदर प्रकरणी काय भूमिका घेतात यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे . सदर व्हिडिओ हा आलिशान बेडरूममध्ये काढलेला असल्याचे दिसून येत आहे.

सदर व्हायरल व्हिडिओत दिसते की, एक महिला सुरुवातीला मोबाईल कॅमेऱ्यासमोर हमसत हमसत स्वतःचं नाव सांगते. तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसत असून आलिशान बेडरूममधील डबल बेडवर बनियनवर बसलेल्या या नेत्याकडे मोबाईलचा कॅमेरा करत म्हणते की, ‘हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा,’ असे म्हणत असताना दचकलेला हा नेता ताडकन बेडवरून उठून पुढं येताना व्हिडिओत दिसतो. व्हिडिओमध्ये महिला त्याचे नाव देखील सांगते .

सदर नेता हा महिलेला अंगावर धावून येत मोबाईलवरील व्हिडिओ बंद करण्यासाठी ढकला-ढकली करतो. याचवेळी ती महिला म्हणते, ‘नाही.आता तू बघंच..तुला नाही सोडणार.तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलता ?’ मात्र ती चवताळून बोलत असतानाच कॅमेरा बंद होतो. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर मंगळवारी सकाळपासून व्हायरल होत असून राज्याच्या राजकारणात या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे.


शेअर करा