महाराष्ट्र हादरला..आधी धर्मांतर मग बलात्कार अन त्यानंतर चक्क , प्रकरण पोलिसात

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना लातूर येथे समोर आलेली असून एका 27 वर्षीय तरुणीचे धर्मांतर करून तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा प्रकार लातूर येथे उघडकीला आलेला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्कार यासह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत डॉक्टर खय्युम खान यांच्यासोबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शहरातील तहसील कार्यालयासमोर खान कॉम्प्लेक्समध्ये पीडित तरुणी हिचे दुकान होते. तिच्या गाळ्याच्या समोर मुख्य आरोपी असलेला अराफत लाईक खान ( वय 28 राहणार लातूर ) हा त्याचे दुकान चालवत होता. अराफत खान याने ऑक्टोबर 2018 मध्ये तरुणीला लग्नाची मागणी घातली आणि तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. एक डिसेंबर 2019 रोजी आपण लग्न करू असे म्हणत मौलाना यांच्याकडून त्याने तिला नमाज आणि कुराण कलमा पढण्याचे देखील शिक्षण दिले आणि कोर्टात जाऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले.

तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आरोपी तिला खाडगाव रोड परिसरात एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अनेकदा त्याने अत्याचार केले मात्र काही दिवसांनी आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्याऐवजी दुसरीकडेच लग्न जुळवले टाकले यानंतर पीडित तरुणीने अराफत याला याप्रकरणी जाब विचारल्यानंतर त्याने आणि त्याच्या घरच्यांनी तरुणीला जीवे मारण्याची आणि धमकी दिली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.

आपली अशी फसवणूक केलेली असल्याने पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि अराफत खान, त्याची आई शाहीन खान, बहिण अफशा फिरदोस उजडे, भाऊजी मूर्जात उजडे, चुलता समीर खान, मेहराज खान, आजोबा डॉक्टर खय्युम खान आणि मुखीत चांदपाशा इनामदार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून मुख्य आरोपी अराफत खान याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.


शेअर करा