हुकूमशाहीकडे वाटचाल ? आधी शब्दांना बंदी आता त्याहीपुढे जात चक्क..

शेअर करा

‘ जुमलाजीवी ‘ या शब्दासह इतर अनेक शब्दांना संसदेत कथित बंदी घालण्यात आलेली असल्याने विरोधकांनी याच्या विरोधात रान उठवले आहे. हा वाद अद्याप सुरूच असताना चक्क संसद परिसरात आंदोलनाला बंदी घालण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राजकीय पक्षांनी सत्य जाणून न घेता टीका करणे टाळावे असे लोकसभा अध्यक्ष यांनी म्हटलेले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यसभेचे सरचिटणीस यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार आंदोलन , विरोध प्रदर्शन, उपोषण किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी संसदभवन परिसराचा वापर करता येणार नाही असे सांगण्यात आले होते त्यावरून काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सरकारला लक्ष्य करताना Vishguru’s latest salvo — D(h)arna Mana Hai! असे खोचक ट्विट केले होते.

केंद्र सरकारकडून सध्याच्या परिस्थितीत हुकूमशाहीचे आदेश काढून लोकशाहीची चेष्टा सुरू आहे. संसद परिसरात आंदोलन करणे हा खासदारांचा अधिकार आहे असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटलेले आहे तर सरकार संसदेत प्रश्न विचारल्यावर देखील बंदी घालणार आहे का ? असा प्रश्‍न शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. देशभरातील विविध पक्षांकडून सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळते आहे. विरोधी पक्ष भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना काही ठराविक शब्द वापरतात आणि त्याच शब्दांना बहुतांश प्रमाणात बंदी घालण्यात आल्याने विरोधी पक्षात संतापाचे देखील वातावरण आहे .


शेअर करा