नगर ब्रेकिंग..लहान मुलाचे प्रसंगावधान अन्यथा तीन चार जणांनी ? , पालकात चिंतेचे वातावरण

शेअर करा

नगर जिल्ह्यात राहुरी इथे एक खळबळजनक घटना समोर आली असून एका लहान मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसलेला आहे. मुलाने आरडाओरडा केल्याने अपहरण करणाऱ्या व्यक्तींनी तेथून पळ काढला. बारागाव नांदूर येथे हा प्रकार घडलेला असून मंडलिक आखाडा हद्दीत मुलाला पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने आरडाओरडा केला म्हणून त्याचा जीव वाचलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मंडलिक आखाडा या भागात अनुराधा मंडलिक यांच्या मालकीचे एक गुऱ्हाळ आहे. या गुऱ्हाळात अनेक परप्रांतीय लोक काम करतात त्यातील पप्पू नावाच्या एका मजुराचे दोन मुले आणि एक लहान मुलगा संध्याकाळी सातच्या सुमारास खेळत होते याच दरम्यान घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन-चार जणांनी पाठीमागे असलेल्या लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हणून त्याने आरडाओरडा सुरू केला.

त्याचा आरडाओरडा ऐकून त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन मुलांनी देखील मोठमोठ्याने आरडाओरडा करत केला त्यामुळे काहीजण तिकडे धावून घेताना दिसल्याने अपहरणकर्त्यांनी लहान मुलाला सोडून दिले आणि शेजारच्या उसात पळ काढला त्यानंतर नागरिकांनी अपहरणकर्ते पळालेल्या उसात त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. सदर घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


शेअर करा