आला पावसाळा.. ‘ अशी ‘ घ्या आपल्या त्वचेची काळजी

शेअर करा

पावसाळा आल्यानंतर वातावरणात बदल झाल्याचा आपल्या त्वचेवर देखील परिणाम होतो. ऋतू जसे बदलत असतात तशी तसे त्याचे परिणाम आपल्या त्वचेवर होतात त्यामुळे पावसाळ्यात त्वचेचे हायड्रेशन, उन्हाळ्यात टॅनिंग आणि हिवाळ्यात कोरडेपणा आपल्या त्वचेला जाणवू लागतो. अशा परिस्थितीत काळजी न घेतल्यास चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात म्हणून त्वचेचा पोत लक्षात घेऊन त्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते.

  • ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांनी पावसाळ्यात वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरावे. तेलातील उत्पादने त्यांना हानी पोहोचू शकतात त्यामुळे विटामिन कॅप्सूलमध्ये फिल्टर पाणी मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचेची चकाकी कायम राहील.
  • जर तुमची त्वचा कोरडी असेल तर काकडीचा रस काढून तो थंड रस फ्रीजमध्ये ठेवून त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करून हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची चकाकी आणखीन वाढेल.
  • स्प्रे करण्याच्या बॉटलमध्ये गुलाब पाणी ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्वचेचा कोरडेपणा जाणवल्यावर त्यात गुलाबजल टाकून त्वचेवर गुलाबजल टाकून काकडीचा रस लावल्यास त्याचा अधिक फायदा होईल.
  • आपल्या त्वचेतील ओलसरपणा कायम ठेवण्यासाठी दही हा सर्वोत्तम उपाय मानला जातो त्यामुळे त्वचेला आंघोळ करण्यापूर्वी दही चोळल्यावर तसेच त्यात आधी गुलाब पाणी टाकल्यानंतर त्वचेला थंडावा राहील आणि आपली त्वचा आणखीन चमकू लागेल.

शेअर करा