आनंदाची बातमी..’ तो ‘ पुन्हा येतोय मात्र घाबरू नका बिबट्या नाही तर

शेअर करा

एकेकाळी भारतात पाळीव प्राणी म्हणूनही चित्ता पाळला जायचा. मोठमोठे राजे आणि रजवाडे यांच्या शिकारीच्या ताफ्यात चित्त्याचा समावेश असायचा मात्र 1952 साली भारतातून चित्ता नामशेष झाला त्यानंतर भारतात पुन्हा चित्ता कधीही दिसला नाही. चित्ता या प्राण्याचे पुन्हा भारतात पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया या देशासोबत भारताने करार केलेला असून त्याअंतर्गत पन्नास चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत.

मध्य प्रदेशातील राष्ट्रीय उद्यानात त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. सुरुवातीला चार नर चित्ते आणि चार मादी चित्ते 15 ऑगस्टच्या आधी भारतात दाखल होणार आहे. दोन्ही देश आपापल्या देशात चित्ता संवर्धनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हवामान बदल आणि व्यवस्थापन यामध्ये एकमेकांना दोन्ही देश सहकार्य करतील.

भारतात आल्यानंतर या चित्त्यांसाठी 10 चौरस किलोमीटरपर्यंत बंदिस्त क्षेत्र तयार करण्यात आलेले आहे. शिकारीचे क्षेत्र आणि राहण्याचे क्षेत्र याला मर्यादा आल्याने भारतातून चित्ता 1952 सालीच नामशेष झालेला आहे. चित्त्यांशी साधर्म्य असलेला बिबट्या भारतात आढळून येत असून दोन्ही प्राणी सारखे दिसत असले तरी वर्तणुकीसह पट्टयांचा प्रकार आणि शिकारीची पद्धत यामुळे त्यांच्यात कमालीचा फरक असतो. आपल्या मालकाशी अत्यंत प्रामाणिक म्हणून चित्त्यांची ओळख आहे तर बिबट्या बेभरवशाचा धोकादायक प्राणी आहे.

चित्ता हा खुल्या मैदानात पाठलाग शिकार करणारा प्राणी असून बिबट्या मात्र लपून घात लावून हल्ला करतो. चित्ता बराच काळ एखाद्या प्राण्याचा पाठलाग करू शकतो तर बिबट्या मात्र इतक्या वेगाने आणि अधिक काळ पाठलाग करू शकत नाही. जबड्याची ताकत ही चित्त्यापेक्षा बिबटयात कित्येक पटीने जास्त असते तसेच बिबट्या हा झाडावर चढूनही शिकार करू शकतो.


शेअर करा