‘ आता तुझ्या सुनेला माझ्याकडे पाठव ‘, कांदिवलीच्या बाजारात ‘ तो ‘ भेटला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली असून 65 वर्षीय सावकाराने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित महिलेचे वय हे 51 वर्ष असून गेल्या सव्वीस वर्षांपासून पैशाच्या जोरावर तिच्यासोबत आरोपी हे घृणास्पद कृत्य करत होता. ब्लॅकमेल करत त्याने तिच्याकडून काही पैसे देखील उकळले मात्र त्यानंतर त्याने चक्क ‘ आता तुझ्या सुनेला माझ्याकडे पाठव ‘ असे सांगितल्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

महिलेने म्हटले आहे की, सव्वीस वर्षांपूर्वी या नवऱ्याशी परिचय असल्याने घरात येत आरोपीने माझ्यावर सर्वप्रथम अत्याचार केला होता त्यानंतर तुझे फोटो आणि व्हिडिओ तुझ्या मुलांना दाखवेल अशा रीतीने ब्लॅकमेल करत तो सातत्याने आपल्यावर अत्याचार करत होता. सध्या आरोपी पुणे येथे राहत असून त्याच्या विरोधात बलात्कार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

पीडित महिला ही मुंबईतील एका चाळीत राहत असताना 1996- 97 च्या दरम्यान आरोपी तिच्या घरात आला. आरोपी हा तिच्या पतीचा चांगला मित्र होता. त्याने त्यावेळी सर्वप्रथम महिलेवर तेव्हा बलात्कार केला मात्र आरोपी प्रभावशाली आणि श्रीमंत असल्यामुळे महिला त्याला घाबरून होती. तिने ही बाब आपल्या बहिणीच्या कानावर घातली त्यावेळी बहिणीने तिला घर बदलण्याचा सल्ला दिला आणि महिला ठाण्यात राहायला गेली त्यानंतर 2002 मध्ये महिलेच्या पतीचा देखील मृत्यू झाला.

झालं गेलं विसरून पुन्हा एकदा महिलेच्या संसाराची गाडी रुळावर येत असताना 2011 मध्ये कांदिवली बाजारात आरोपीने तिला पाहिले आणि तिचा मोबाईल नंबर तिच्याकडून दमदाटी करून घेतला त्यावेळी आरोपीने पुन्हा तिच्यासोबत पहिल्यासारखा प्रकार सुरू केला. परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर घेऊन जात तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आले. महिलेने विरोध केला असता तिला तुझ्या मुलांना झाला सगळा प्रकार सांगेल, अशी देखील त्याने धमकी दिली.

काही कालावधीनंतर तो तिच्याकडे पैशाची मागणी करू लागला त्यानंतर महिलेने ब्लॅकमेलच्या भीतीने त्याला तब्बल पाच ते सहा लाख रुपये दिले आणि महिलेने राहते घर सोडले. पुन्हा फेब्रुवारी 2011 मध्ये आरोपीने तिला मुलाचे लग्न आहे असे सांगत आणखी अडीच लाख रुपयांची मागणी केली त्यावेळी महिलेने पैसे देण्यास नकार दिला तरी देखील आरोपीने धमकी दिल्याने तिने दागिने विकून त्याला पैसे दिले. काही कालावधीनंतर पुन्हा आरोपी महिलेला भेटला त्यावेळी त्याने चक्क महिलेच्या महिलेला तुझ्या सुनेला माझ्याकडे पाठव अशी मागणी केली त्यामुळे मात्र पीडित महिला ही संतप्त झाली आणि तिने आरोपीच्या विरोधात पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.


शेअर करा