सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..

शेअर करा

सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली आहे.

सलमान खान याला धमकी देण्यात आल्यानंतर त्याने मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन आपल्याला स्वसंरक्षणार्थ हत्यार बाळगण्याचा परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता त्यानंतर तो मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या भेटीला शुक्रवारी संध्याकाळी पोहोचला. त्यांच्यामध्ये पंधरा मिनिटे चर्चा झाली त्यावेळी त्याने आपल्या सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्याचे सांगितले आहे.


शेअर करा