रुपयाची घसरण सुरूच , रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणतात की..?

शेअर करा

2014 सालापासून आत्तापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयात तब्बल 25 टक्‍क्‍यांची घसरण झालेली असल्याची कबुली केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. गेल्या काही महिन्यात रुपयाची किंमत आणखीनच घसरत असल्याचे पाहायला मिळत असून डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 80 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यासह सर्व आयात करण्यात येत असलेल्या वस्तू यांचे दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत .

रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या प्रकरणावर बोलताना विकसित आणि विकसनशील देशाच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत स्थितीत आहे असे प्रतिपादन केले आहे तर दुसरीकडे रिझर्व बँकेकडून भारताकडे केवळ दहा महिने आयात करू शकेल इतकेच परकीय चलन शिल्लक आहे असे सांगण्यात आल्याने देशातील परिस्थिती दहा महिन्यानंतर भयावह होण्याची शक्यता आहे.

शक्तीकांत दास म्हणाले की महागाईचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी २०१६ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या सध्याच्या आराखड्याने चांगले काम केलेले आहे. रुपयाची घसरण झाल्यामुळे आयटी कंपन्या आणि निर्यातदार यांना लाभ होतो मात्र आयात महाग झाल्याने देशांतर्गत महागाई देखील वाढते. रिझर्व बँक बाजारात डॉलरचा पुरवठा करत आहे आणि पुरेशा प्रमाणात रोख रक्कम राहील याची खबरदारी घेण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रात अशाप्रकारे व्यवहार मोठ्या संख्येने होत आहेत मात्र गरज पडल्यास सरकार त्यात हस्तक्षेप करेल, असेही ते म्हणाले .


शेअर करा