वैवाहिक सुख मिळेना म्हणून दोन प्रियकर हाताशी धरून बायकोने केला ‘ मास्टरप्लॅन ‘

  • by

त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून तिने त्याच्यासोबत लग्न केले. लग्नाच्यावेळी त्याने आपले खरे वय लपवले मात्र लग्न झाल्यानंतर चाणाक्ष असलेल्या पत्नीच्या ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. लग्न झाल्यावर त्यांच्या वयात तब्बल २० वर्षांचे अंतर असल्याचा महिलेला उलगडा झाला त्यातून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी वाढल्या आणि वाद विवादास सुरुवात झाली. नवऱ्याने आपल्याला फसवले याचा ‘ खटका ‘ तिच्या डोक्यात होताच, त्यातून दोन प्रियकराच्या मदतीने तिने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना दिल्ली इथे घडली असून प्रियांका असे आरोपी महिलेचे नाव असून पती कृष्णा त्यागी (वय ५० ) यांचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रियांकाच्या नवऱ्याच्या आणि तिच्या वयामध्ये बरच अंतर होतं. नवरा तिच्यापेक्षा २० वर्षाने मोठा होता. लग्नाच्यावेळी त्याने त्याचं खरं वय लपवलं होतं त्यामुळे प्रियांका निराश होती. खून केल्यानंतर नैराश्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केली, असे प्रियंकाने दाखवण्याचा प्रयत्न केला. खून करण्यासाठी तिने तिच्या प्रियकरांची मदत घेतली.आरोपींनी आधी ओढणीने गळा आवळून कृष्णा त्यागीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या आहे, असे भासवण्यासाठी त्याचा मृतदेह पंख्याला लटकवला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

१८ ऑगस्टला प्रियंकाने कृष्णा त्यागीला सरकारी रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित केले. त्यागी कुटुंबीय तिथे पोहोचल्यानंतर प्रियंकाने आदल्यारात्री अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तो आजारी होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांना सांगितले. डॉक्टरांना मृतदेहाच्या गळयाजवळ काही व्रण दिसले. त्यावेळी प्रियंकाने तिथे रडण्यास सुरुवात केली व स्वत:हून त्याने जीवन संपवले असे सांगितले मात्र तिच्या वागण्यावर डॉक्टरांना संशय आला.

त्याचवेळी पतीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीमध्ये रोहिणी येथील प्रियंकाच्या घरात करण नावाचा एक माणूस राहत असल्याचे समजले. ती सर्वांना नातेवाईक म्हणून करणची ओळख करुन द्यायची मात्र पत्नीचे त्याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली तशातच कृष्णा त्यागीच्या मृत्यूनंतर करण देखील गायब होता. पोलिसांना प्रियंकाच्या वर्तनावर संशय आला. त्यांनी खोदून खोदून चौकशी सुरु केल्यानंतर तिने करण आणि त्याचा मोठा भाऊ वीरु बर्माच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली असे रोहिणीचे डिसीपी पी.के.मिश्रा यांनी सांगितले.

तपासादरम्यान प्रियांकाच्या बहिणीने करणचा भाऊ असलेल्या वीरू याच्यासोबत प्रियांकाची ओळख करून दिली होती. ओळख झाल्यानंतर काही कालावधीतच प्रियंकाने त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याच्यासोबत देखील प्रेमसंबंध प्रस्थापित केले. प्रेमात पागल झालेले दोन्ही भाऊ आणि प्रियांका यांनी मिळून प्रियांकाच्या पतीचा घात केला. पोलिसांनी तिघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून प्रियंका आणि करण पोलिसांच्या ताब्यात असून वीरुचा शोध सुरु आहे.