अन अखेर ‘ त्या ‘ तरुणाचा मृत्यू , रेल्वेने पोलीस येत होते घेऊन

शेअर करा

एक खळबळजनक घटना मनमाड येथे उघडकीस आली असून एका तरुणावर मुंबई इथे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याला अटक करण्यासाठी मुंबईतील कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे धाव घेत त्याला बेड्या ठोकल्या होत्या त्यानंतर त्याला मुंबईत घेऊन येत असताना मनमाड रेल्वेस्थानकावर त्याने धावत्या ट्रेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार तबरत रायणी उर्फ चिकणे ( वय 30 ) असे त्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बलरामपुर येथील रहिवासी आहे. कांदिवली पश्चिम येथील एका ज्वेलरी दुकानातून लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या प्लेट त्याने चोरल्या होत्या आणि त्यानंतर तो उत्तरप्रदेशात पळून गेला होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत त्याला उत्तर प्रदेश येथे बेड्या ठोकल्या.

उत्तर प्रदेशातून मुंबईत परतत असताना पुष्पक एक्सप्रेसने पोलिसांसोबत तो येत असताना मनमाड रेल्वे स्थानकाजवळ त्याने लघुशंकेसाठी परवानगी मागितली मात्र दरवाजा जवळ पोहोचताच त्याने हवालदार केसरकर यांना धक्का दिला आणि धावत्या ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर उडी मारली . पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली त्यावेळी तो गंभीर जखमी झालेला होता. त्याच्या हातावर आणि डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्याचा या घटनेत मृत्यू झालेला आहे.


शेअर करा