नात्याला काळिमा..चक्क बहिणीवर अत्याचार करणारा सख्खा भाऊच निघाला

शेअर करा

महाराष्ट्रात नाती शर्मसार करणारी एक घटना वर्धा शहरात उघडकीला आली असून मुलीचे पोट दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ती चक्क सहा महिन्यांची गर्भवती आढळून आलेली आहे. सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालय येथे ही घटना उघडकीला आलेली असून मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे चक्क तिच्या सख्ख्या भावाने तिच्यासोबत वेळोवेळी अत्याचार केला असे सांगितलेले आहे.

आई वडील नोकरीनिमित्त बाहेर गेलेले असताना घरी बहिण-भाऊ एकटेच असायचे यावेळी सख्खा भाऊ आपल्यासोबत हा प्रकार करत होता असे मुलीचे म्हणणे आहे. मुलीचे वय 17 वर्षे असून तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले होते त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. घरच्यांना या प्रकाराची माहिती समजल्यानंतर त्यांनी प्रकरण पोलिसात जाऊ नये म्हणून प्रयत्न केले मात्र अखेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्या भावाला ताब्यात घेतलेले आहे.


शेअर करा