‘ त्या ‘ विकृतावर लक्ष ठेवा अन मला कळवा , पोलीस निरीक्षकांना फोन आला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांकडे पाहत अश्लिल चाळे करणाऱ्या एका विकृताला पोलिसांनी महिलांच्या समोर चांगलेच बदडून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना हा त्रास देत होता मात्र त्याच्या विरोधात तक्रार देण्यास कोणी धजावत नसल्याने त्याचा हा उपद्रव वाढतच चाललेला होता मात्र महिला पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि शेख रहीम शेख अजीज ( वय 21 राहणार शम्सनगर, शहानुरवाडी , औरंगाबाद ) याला भररस्त्यात पोलिसांनी बदडून काढले

उपलब्ध माहितीनुसार, उस्मानपुरा भागात देवानगरी परिसरात महिलांचे घराबाहेर पडणे याने अवघड करून टाकले होते. महिला रस्त्याने जाताना दिसल्या की त्यांच्याकडे पाहून हा आक्षेपार्ह चाळे करत असायचा तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे शाब्दिक देखील वक्तव्य तो करत असायचा. त्याची दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने महिला पुढे येत नव्हत्या आणि तक्रार नसल्याने पोलिसही काही करू शकत नव्हते.

सदर प्रकार हा पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि परिसरातील काही तरुणांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. सकाळी नऊच्या सुमारास हा विकृत पुन्हा एकदा देवानगरी भागात आला आणि काही महिला रस्त्याने जात असताना त्यांच्याकडे पाहत अश्लील चाळे सुरू केले आणि त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य देखील केले अन त्यानंतर एका महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली.

अवघ्या काही मिनिटात पोलीस निरीक्षक गीता बागवडे पथकासह तिथे पोहोचल्या आणि परिसरातील सर्व महिलांसमोर त्याची जोरदार धुलाई करण्यात आली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार दिसल्यास ११२ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .


शेअर करा