महाराष्ट्रात पुन्हा सामूहिक आत्महत्या, लहान मुलांनाही नाही सोडलं

शेअर करा

एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून सामूहिक आत्महत्येचा एक प्रकार समोर आलेला आहे. पान सुपारी विक्री व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी ही घटना उघडकीला आले असून घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, शिवाजीनगरच्या रोड क्रमांक 14 येथील इंदिरानगर झोपडपट्टीत शकील खान ( वय 34 ) आणि त्यांची पत्नी रजिया ( वय 25 ) , मुलगा सर्फराज ( वय 7 ) आणि मुलगी अतिशा (वय 3 ) हे राहत होते. शकील यांच्यासोबत त्यांचा भाऊ देखील राहायचा मात्र शुक्रवारी सकाळी तो घरी आला तेव्हा घराचे दार आतून बंद होते. अनेकदा आवाज देऊन देखील कोणी ही दरवाजा उघडत नसल्याचे समोर आल्यावर भावाने शेजार्‍यांना बोलावले.

शेजारी आल्यानंतर त्यांच्या मदतीने भावाने दरवाजा तोडला त्यावेळी शकील यांनी गळफास घेतल्याचे समोर आले तर रजिया आणि त्यांची दोन्ही मुले देखील मयत असल्याचे समोर आल्यावर भावाने जागीच हंबरडा फोडला. घटनास्थळावरून पोलिसांना कुठलीही चिठ्ठी हाती लागलेली नसून शकील यांनी पत्नी आणि मुलांना सॉफ्ट ड्रिंकमधून विष देऊन त्यांचा खून केला असावा तसेच आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. पोलीस सध्या शकील यांच्या मोबाईल मधील कॉल आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती याचा आधारावर तपास करत असल्याचे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितलेले आहे.


शेअर करा