चक्क वीज कंपन्यांच्या नावाचा वापर करून बँक खाते होतंय साफ , ‘ अशी ‘ ह्या काळजी

शेअर करा

देशात ऑनलाइन पेमेंट प्रकार सुरू झाल्यानंतर फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सुरुवातीला एसएमएसच्या माध्यमाने फसवणूक व्हायची मात्र आता याही पुढे जात मोठ्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून एक लिंक पाठवून त्यातून आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. आता विज बिल कंपनीच्या नावाने मेसेज पाठवून नागरिकांच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करत लुबाडणूक करण्यात येत आहे.

विज बिल कंपन्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलेले असून त्यामध्ये आपले वीजबिल थकलेले आहे असा कुठलाही संदेश कोणतीही वीज कंपनी दहा आकडी मोबाईल नंबर वरून पाठवत नाही आणि दहा आकडी मोबाईल नंबरवर फोन करण्याचे देखील सांगत नाही. नागरिकांनी देखील भान ठेवणे गरजेचे आहे असे म्हटलेले आहे. सुशिक्षित नागरिकांच्या देखील अनेकदा ही गोष्ट लक्षात येत नाही आणि त्यातून ते फसतात असे सांगण्यात आले आहे.

बनावट संदेश पाठवणारे लोक जी लिंक आपल्याला पाठवतात त्यावर क्लिक करताच आपल्या मोबाईल मध्ये हे ‘ एनी डेस्क ‘ किंवा तत्सम काही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर आपल्या मोबाईलचा संपूर्ण ताबासमोरील कडे जातो त्यामुळे आपल्या मोबाईलवरील ओटीपी आपले लॉगिन डीटेल्स इतर सर्व माहिती हस्तगत केल्यानंतर आपले खाते साफ केले जाते. झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यात अद्याप देखील मोठ्या प्रमाणात पडताळणी न करता सिम कार्ड मिळते आणि त्याचा वापर करून असे उद्योग केले जात आहेत. डुप्लिकेट नंबर वरून सिम कार्ड देण्यात आल्यानंतर त्याची उलट तपासणी देखील पोलिसांना करणे अत्यंत अवघड होते आणि त्यातून हे प्रकार होत आहेत .

लोकांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये घुसखोरी करून ते पैसे प्रथम पेमेंटच्या वॉलेटमध्ये घेतले जातात आणि त्यानंतर एटीएमचा वापर करून ते काढून घेण्यात येतात. अनेक बँका सध्या मोबाईल ओटीपीचा वापर करतात आणि कागदपत्रांची पडताळणी फारशी गांभीर्याने करत नसल्याने असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कुठलेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना दहा वेळा विचार करावा तसेच कुठल्याही अनोळखी मेसेजला तसेच लिंकला क्लिक करू नये आणि काळजी घ्यावी असे वीजवितरण विभागाकडून आणि पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा