स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली मात्र यापुढे..

शेअर करा

स्मृती इराणी यांच्या मुलीचे गोवा येथील कथित बार प्रकरण मागील आठवड्यात चांगलेच चर्चेत होते.कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ त्यांची ‘ संस्कृती दाखवून दिली आहे त्यामुळे इराणी यांनी तात्काळ त्यांची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिलेला आहे.

मुंबई महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली स्मृती इराणी यांच्या डहानु येथील निवासस्थानी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला होता यावेळी बोलताना, ‘ स्मृती इराणी यांची अठरा वर्षाची मुलगी गोव्यात अवैध बार चालवते त्याविरोधात काँग्रेसने प्रश्न विचारले अन त्यामुळे इराणी अडचणीत आलेल्या आहेत त्याचा राग धरून त्यांनी श्रीमती गांधी यांच्याशी संसद परिसरात हुज्जत घातली. सोनिया गांधी या 75 वर्षाच्या आदरणीय राजकीय नेत्या आहेत आणि संविधानाने विरोधकांना जाब विचारण्याचा हक्क दिलेला आहे पण कोंडीत सापडल्यानंतर मुलीचे अवैध कारनामे बाहेर काढल्यावर स्मृती इराणी यांनी असभ्य वर्तन केले. आमच्या नेत्यांचा अपमान कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, ‘ अशा स्पष्ट शब्दात संध्याताई यांनी इराणी यांना ठणकावले आहे.


शेअर करा