.. अन सलमान भाईच्या हातात पडलंय ‘ओरिजनल रिव्हॉलर ‘

शेअर करा

चित्रपटात आपल्या स्टंटबाजीचे जोरदार प्रदर्शन करत एका रिव्हॉल्व्हरमधून शेकडो गुन्हेगारांना संपवणारा सलमान खान याच्या हातात अखेर ओरिजनल शस्त्र पडलेले आहे. सलमान खान याला मुंबई पोलिसांनी शस्त्र परवाना मंजूर केला असून काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या जीविताला धोका आहे असे सांगत शस्त्र परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. सलमान खान आणि त्याच्या वडिलांना गेल्या काही वर्षांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्याच्या घराची सुरक्षा देखील वाढवलेली आहे.

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पाच जून रोजी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिद्धू मूसावाला याची हत्या करणाऱ्या बिस्नोई टोळी यांच्याकडून सलमानला धमकीचे पत्र आलेले होते त्यामध्ये सिद्धू मूसावालासारखेच तुझे देखील हाल करून तुला ठार मारू, असे म्हटले होते त्यामुळे 22 जुलै रोजी सलमान खान याने मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता.

पोलीस प्रक्रियेनुसार सलमानचा शस्त्र परवान्याचा अर्ज पडताळणीसाठी तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यासाठी परिमंडळ नऊच्या पोलीस उपायुक्तांकडे पाठवण्यात आला होता त्यानंतर तेथून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सलमानच्या शस्त्र परवान्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.


शेअर करा