आता राज्यपालांना छत्रपती उदयनराजेंनीही सुनावलं, म्हणाले ‘ इतकं असेल तर..’

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी सतत चर्चेत राहणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काहीशी वेगळी भूमिका मांडत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी इथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशा खरमरीत शब्दात राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा ठपका त्यांच्यावर असताना त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून त्यामध्ये, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे., ‘असे म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या वक्तव्याबद्दल जोरदार टीका झाल्यावर माफी मागण्याची वेळ आली असून त्यांनी बिनशर्त माफी मागत मोठ्या मनाचा महाराष्ट्र आपल्याला नक्की माफ करेल असे देखील म्हटलेले आहे.