‘ आई दत्तूमामा आपल्या घरात आलाय अन.. , ‘ आई पोहचली तेव्हा चक्क..

शेअर करा

एक अत्यंत खळबळजनक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेली असून आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले असताना एका व्यक्तीने चिमुकली घरी असल्याचे पाहून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि लहान भावाला पैसे देऊन दुकानात पाठवले. त्यानंतर बारा वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला मात्र या मुलीने प्रसंगावधान राखत आईला तात्काळ फोन केला आणि ‘ आई तू लवकर घरी ये दत्तू मामा माझा हात धरतोय ‘ असे सांगितले त्यानंतर आई तात्काळ घरी आली आणि त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला जोरदार मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार, औरंगाबाद शहराजवळ वाळूज भागात हा प्रकार घडला असून दत्तू तांबे ( राहणार वाळूज तालुका गंगापूर ) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या पाच वर्षीय भावाचा वाढदिवस असल्याने आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले होते यावेळी पीडित मुलगी आणि तिचा भाऊ हे दोघेच घरी होते. त्यानंतर घराशेजारच्या दुकानात कामाला असलेला दत्तू तांबे याने या मुलीच्या आजीला फोन करून मुलीचे आई-वडील हे बाहेर गेले आहेत याची खात्री करुन घेतली आणि त्यानंतर तो पीडित मुलीच्या घरात घुसला अन त्याने तिच्या लहान भावाला पैसे दिले आणि दुकानात जाऊन ये असे सांगितले.. तो बाहेर जाताच दत्तू याने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.

आपल्या सोबत होत असलेल्या या प्रकाराने पीडित मुलगी घाबरून गेली आणि रडायला लागली मात्र तिने स्वतःला सावरत आईला फोन करून ‘ आई दत्तूमामा आपल्या घरात आलाय . तू लवकर घरी ये. दत्तू मामा माझा हात धरतोय ‘ असे सांगितले त्यानंतर आई वडील तात्काळ घरी आले तेव्हा आरोपी दत्तू हा घरातच होता हे पाहून त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. परिसरातील काही नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी देखील त्याला धरून चांगला चोपून काढला त्यानंतर वाळूज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा