‘ सांगा कुठे कुठे स्पर्श केला ‘ पोलीस ठाण्यातच आला ‘ असा ‘ अनुभव

शेअर करा

गुन्हेगारीचा कुठलाही काही प्रकार झाला की सर्व प्रथम आठवण येते ती पोलिसांची मात्र भारतात काही ठिकाणी पोलिसांच्या भूमिका देखील अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत अशीच एक घटना उत्तर प्रदेश येथील कानपूर येथे समोर आली असून विनयभंग झाल्यामुळे संतप्त झालेली महिला पोलिस ठाण्यात पोहोचली त्यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या इन्स्पेक्टर यांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असेच प्रश्न विचारलेले आहेत. पोलीस ठाण्यात कुठलाही न्याय मिळाला नाही म्हणून महिलेने पोलिस आयुक्त कार्यालय यांच्याकडे आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे.

कानपुर पोलीस आयुक्त कार्यालयात ही तरुणी पोहोचली होती. सुरुवातीला तिने इंस्पेक्टर दुर्गा प्रसाद यांच्याकडे रावतपुर पोलीस ठाण्यात तक्रार गेली होती. तक्रारीमध्ये तिने आपण मुख्यमंत्र्यांचे पीआरओ आहोत असे सांगत शिवकुमार सिंह नावाच्या तरुणाने आपला विनयभंग केला असे म्हटले होते मात्र पोलिस निरीक्षक दुर्गाप्रसाद यादव यांनी तक्रार दाखल करून घेण्याऐवजी ‘ आरोपीने कुठे कुठे स्पर्श केलेला आहे ते आम्हाला सांगा ‘ असे म्हटले आणि आरोपी विरोधात साधे कलम लावले त्यामुळे त्याला लवकर जामीन मिळाला असा आरोप केलेला आहे.

पीडित महिला ही रावतपुर येथील रहिवासी असून तरुणी पोलीस आयुक्तालयात पोहोचल्यावर अवघ्या काही मिनिटात पोलिसही तिथे पोहोचले आणि तिला ऑफिसला जाऊ न देण्यापासून रोखले. पोलिसांना तिला आयुक्त यांना भेटण्यापासून रोखायचे होते. कारवाईचे आश्वासन देऊन पोलिसांनी तिला सोबत घेतले मात्र त्यानंतर पोलिसांनी देखील या तरुणीचा चांगलाच धसका घेत आरोपीच्या विरोधात या एफआयआर नोंदवली असून त्याला अटक केलेली आहे तसेच निःपक्ष पद्धतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा