महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..

पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता यावा म्हणून ही जेलर त्याला कारागृहात कधी चेकिंग होणार आहे याची देखील माहिती फोनवर देत होती मात्र काही दिवसात त्यांचे बिंग फुटले आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, एम्मा जॉन्सन असे या जेलरचे नाव असून तिला 15 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठेवण्यात आलेली आहे तर नोकरीवरून देखील तिला निलंबित करण्यात आलेले आहे. तुरुंगात असलेल्या तिचा प्रियकर मार्कस सोलोमोन याला देखील तेरा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

न्यायाधीशांनी या महिला जेलरला जेव्हा शिक्षा सुनावली त्यावेळी, ‘ तुम्ही चक्क कैद्याच्या प्रेमात पडलेल्या आहात हे आम्ही मान्य करू शकतो मात्र जेलर आपले काम अभिमानाने करत असतो. अशा पद्धतीने कायद्याचा गैरवापर होत असताना अशा लोकांना ही शिक्षा होणे गरजेचे आहे. संसदेने गुन्हा घोषित केला असताना देखील कैदी मोबाईल वापरत होता ‘, हे देखील न्यायालयाच्या समोर आलेले आहे.

कोर्टात उलट तपासणी सुरू असताना एम्मा जॉन्सन आणि मार्कस सोलोमोन यांच्यात बातचीत देखील झाली होती. मार्कस हा जेलमध्ये आयफोन विकायचा आणि त्यातून मिळालेले पैसे ही जॉन्सन स्वतःच्या खात्यावर घेत होती. सदर प्रकरणी पुरावे न्यायालयाच्या समोर आल्यावर न्यायालयाने दोघांनाही शिक्षा ठोठावली आहे.