नाचत नाचत तलवार घेऊन आली भाचीचे शीर उडवले , अल्पवयीन मुलगी ताब्यात

एक अत्यंत खळबळजनक घटना देशात उघडकीला आलेली असून होऊन आदिवासी भागातील एका अल्पवयीन मुलीने आपल्या नऊ वर्षाच्या भाचीचे शीर तलवारीने धडापासून वेगळे केलेले आहे या खळबळजनक घटनेनंतर या मुलीला ताब्यात घेण्यात आलेले आहे . राजस्थानमधील डूंगरपुर येथील एका आदिवासी भागात हा प्रकार घडलेला आहे. आरोपी मुलगी हिची वागणूक गेल्या काही महिन्यांपासून सामान्य नव्हती त्यामुळे ती आणि तिचे कुटुंबीय एका खोलीत दशामाता या देवीची पूजा करत होते त्यावेळी 15 वर्षीय मुलीने तलवार हातात घेऊन चक्क नऊ वर्षाच्या भाचीचे शिर धडावेगळे केले.

चीतरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गोविंद सिंह यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘ मुलगी अचानकपणे असामान्य पद्धतीने वागू लागली आणि नाचत नाचत घरात ठेवलेली तलवार घेऊन आली. हिंसक पद्धतीने ती पुढे येत असतानाच तिच्या हातात तलवार पाहून आईवडील घाबरले मात्र याच दरम्यान ती दुसर्‍या खोलीत शिरली आणि तिने नऊ वर्षाच्या भाचीचे शीर धडावेगळे केले. ‘ असे सांगितले आहे.

आरोपी मुलगी ही इयत्ता दहावीत शिकत असून वस्तीगृहात राहत होती मात्र त्यानंतर ते घरी आल्यावर तिच्यात बदल झाले आणि तिच्यावर देवीचा कोप झाला अशी तिच्या घरच्यांशी श्रद्धा होती. मानसिक रुग्ण असल्याने तिच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र ती अचानकपणे आक्रमक व्हायची आणि त्यानंतर काही वेळातच पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीसारखी वागू लागायची. घरात तिच्यावर अंगारे-धुपारे यांचा वापर करत उपचार सुरु होते. सदर घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.