मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिरवणुका काढण्यात व्यस्त , कोणते खाते कुणाकडे ?

शेअर करा

राज्यात तब्बल एक महिना उलटून गेला तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्यापपर्यंत रखडलेलाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरवणुका काढून केवळ शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत तर सामान्य माणसाच्या न्याय हक्काची या ईडी सरकारला कुठलेही घेणे-देणे राहिलेले नाही. ‘ हम करे सो कायदा ‘ अशी सरकारची परिस्थिती झालेली आहे, ‘ अशी टीका आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

मुंबई येथे बोलताना प्रीती मेनन म्हणाल्या की, ‘ महाराष्ट्रात दोन मंत्री मिळून सरकार चालवत असून बंडखोरी झाल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी होऊनही एक महिना उलटून गेला आहे मात्र अद्यापही त्यांना मंत्रिमंडळ तयार करण्यात अपयश आलेले आहे. एका महिन्यात त्यांच्यापैकी कोणते खाते कोणाकडे आहे आणि सरकार नेमके कोण चालवतोय याची कोणालाच माहिती नाही.

सरकारने नियोजित पावसाळी अधिवेशन देखील अद्याप घेतले नाही त्यामुळे नागरिकांच्या समस्या देखील प्रशासनापर्यंत पोहोचलेल्या नसून नागरिकांना कोणी वाली राहिलेले नाही. महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने नंतर शेतकरी बांधव देखील अडचणीत सापडलेला आहे अशावेळी कुणाकडे दाद मागायची हाच प्रश्न निर्माण झालेला आहे , ‘ असेही त्या पुढे म्हणाल्या.


शेअर करा