राहुरीत सापडली ‘ नको ती ‘ औषधे , किंमत ऐकाल तर ..

नगर येथील गर्भपात औषध प्रकरण काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते त्यानंतर अशाच स्वरूपाची आणखी एक घटना राहुरी शहरात घडली असून गर्भपाताच्या गोळ्या तसेच नशा आणणाऱ्या गोळ्या आणि चक्क शारीरिक संबंधांच्या वेळी उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा सुमारे दीड कोटी रुपयांचा साठा पकडण्यात आलेला आहे .पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील नांदूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सदर माहिती ही पोलिस पथकाला समजल्यानंतर बुधवारी सकाळीच राहुरी येथे तीन ते चार जणांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शहर हद्दीत बारागाव नांदूर रोड परिसरात एका मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडवर धाड टाकण्यात आली त्यावेळी तिथे शारीरिक संबंधाच्या वेळी उत्तेजित करणाऱ्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा असणाऱ्या गोळ्या तसेच अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार या औषधांची किंमत सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत आहे.

सदर कारवाई ही पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, उपनिरीक्षक सज्जन नारेडा उपनिरीक्षक ज्योती डोके, हवालदार आजिनाथ पाखरे, प्रवीण अहिरे यांच्या पथकाने केली असून सदर कारवाईबद्दल पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.