संगमनेरमध्ये खळबळ..’ त्याच्या ‘ त्रासाला वैतागून कामही सोडले मात्र तरीही

एक अत्यंत खळबळजनक अशी घटना संगमनेर येथे उघडकीला आली असून एका रुग्णालयात ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलणाऱ्या एका 27 वर्षीय विवाहित असलेल्या महिलेचे फोटो काढून तिला ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मानसिक त्रास देणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निजाम चांदभाई शेख ( राहणार रहमतनगर संगमनेर ) असे या व्यक्तीचे नाव असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे सुमारे आठ महिन्यांपर्यंत तो आपल्यासोबत असा प्रकार करत होता. फिर्यादी महिला आणि निजाम हे एकाच रुग्णालयात काम करत आहेत त्यामुळे त्याने आपण ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलत असताना आपले फोटो काढले होते आणि ते फोटो आपल्या पतीला पाठवण्याची सातत्याने तो धमकी देत होता असे म्हटले आहे.

पीडित महिलेने त्याला हे फोटो डिलीट करून टाकण्याची वारंवार विनंती केली त्यानंतर त्याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिचे कपडे बदलताना काढलेले फोटो तिला दाखवले. त्याच्या त्रासाला वैतागून अखेर महिलेने काम देखील सोडून दिले मात्र तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. महिलेच्या एका नातेवाईकाच्या मोबाईलवर देखील त्याने हे फोटो पाठवले असेही पीडित महिलेचे म्हणणे आहे.