‘ ब्लॅक फ्रायडे ‘ आंदोलनाने केंद्राची उडवली झोप, राहुल गांधींना दिल्ली पोलिसांकडून अटक

शेअर करा

देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात काँग्रेसने आज ‘ ब्लॅक फ्रायडे ‘ आंदोलन केले असून दिल्ली येथील या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आलेली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर राहुल गांधींनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट करून माहिती दिलेली आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या दडपशाहीला आपण घाबरत नाही. लोकांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवत राहणार, असे म्हणत केंद्राला आव्हान दिलेले आहे

काय आहे राहुल गांधी यांची पोस्ट ?

पुन्हा एकदा सार्वजनिक समस्या मांडल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मला अटक केली आहे.मला माहीत आहे, मी जितके खरे बोलेन, जितके लोकांसाठी लढेन तितके माझ्यावरील हल्ले वाढतील. देशाचे रक्षण करणे, लोकशाहीचे रक्षण करणे हे माझे काम आहे आणि ते काहीही झाले तरी मी करत राहीन.

राहुल गांधी यांनी गेल्या काही काही महिन्यांपासून सातत्याने जनतेशी जिव्हाळ्याचे असलेले विषय जसे महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी याच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडलेली पाहायला मिळत आहे. ‘ मी पंतप्रधान मोदी यांना घाबरत नाही ‘ अशा शब्दात कुठल्याही पद्धतीच्या कारवाईला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे असेही ठणकावले आहे.

राहुल गांधी यांना जनतेचे महत्वाचे प्रश्न समोर मांडण्यास सुरुवात केल्यावर नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा राहुल गांधी आणि काँग्रेस यांना मिळत असल्याचे चित्र आहे. ‘ जो सत्य परिस्थिती ला घाबरतो तो त्याच्या विरोधातील लोकांना धमकावयाला सुरू करतो ‘ असेदेखील राहुल गांधींनी म्हटले आहे.


शेअर करा