नगरकरांना घरपोच घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले मिळावीत , पल्लवी जाधव यांची मागणी

नगर महापालिकेने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी शहरातील अनेक भागात अद्याप बिलच मिळालेले नाही म्हणून देखील नागरीक शास्ती माफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांना घरपट्टी आणि पाणीपट्टी याची बिले मिळावी यासाठी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी मनपा आयुक्तांकडे मागणी केली आहे.

पल्लवी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात, ‘ महापालिकेने घेतलेला शासकीय माफ करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असाच आहे मात्र सावेडी उपनगरातील तसेच सावेडी गाव येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांना तीन ते चार वर्षांपासून कोणत्याच पद्धतीने घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिले आलेली नाही त्यामुळे ही रक्कम नक्की किती आहे हे देखील त्यांना माहीत नाही. अनेक नागरिकांची पैसे भरण्याची मानसिकता असून रक्कमच माहीत नाही म्हणूनही रक्कम भरण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत, असे म्हटले आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी याच्या पावत्या घरपोच दिल्यास अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर कर भरतील आणि महापालिकेची देखील वसुली मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक परिस्थिती सुधारून निधीचा महापालिकेतील विकास कामे मार्गी लावण्यासाठी वापर होऊ शकेल असेही त्यांनी सुचवले आहे.