‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही ‘ , राहुल गांधी यांनी ठणकावले

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ‘ मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही . हेरॉल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईला आपण घाबरणार नाही मात्र आपली बाजू प्रभावीपणे मांडत राहू ‘, असे म्हटले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्ड कार्यालयाला ईडीने सील ठोकले होते तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर दिल्ली पोलिसांनी अडथळे देखील निर्माण केले याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत, ‘ आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आम्ही घाबरणार नाही. नरेंद्र मोदी यांना आम्ही भीत नाही ‘, असे स्पष्टपणे ठणकावले आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘ त्यांना काय करायचे ते करुद्या त्याने काहीही फरक पडणार नाही. मी सतत लोकशाहीचे रक्षण तसेच या देशाचा सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी काम करत राहील. थोडा दबाव टाकून आम्हाला गप्प करता येईल असे त्यांना वाटते मात्र आम्ही गप्प राहणार नाही. नरेंद्र मोदीजी अमित शहाजी या देशाच्या लोकशाही विरुद्ध जे करत आहेत त्याविरुद्ध आम्ही सतत लढत राहू. सत्याला बंदिस्त केले जाऊ शकत नाही, ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा