धनुष्यबाण कुणाचा ? उद्धव ठाकरे गटाला दिलासा देणारा निर्णय

महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात हा निर्णय आता पाच सदस्य खंडपीठाकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली असून सर्वोच्च न्यायालय आता सोमवारी निर्णय देणार आहे तोपर्यंत शिवसेनेच्या पक्षचिन्हाबद्दल निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेऊ नये अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असल्याने उद्धव ठाकरे गटासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

सरन्यायाधीश एन . व्ही . रमणा यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना दोन्ही गटांना आठ ऑगस्टपर्यंत लेखी युक्तिवाद देण्याचे सांगण्यात आले आहे. पक्षकारांनी बाजू मांडण्यास मुदत वाढवून मागितली तर त्याबाबत निर्णय निवडणूक आयोगाने विचार करावा मात्र निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे. सदर प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे पाठवावे की नाही यावर सोमवारी निर्णय होणार आहे.

शिंदे गटाने आपणच मूळ शिवसेना आहोत म्हणून पक्षाचे नाव आणि चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती त्यावर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आठ ऑगस्टपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे मात्र बंडखोर आमदार हे पात्र की अपात्र हेच अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने आयोगाला सुनावणी करण्यापासून रोखण्याची मागणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.