पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत विवाहिता त्याच्यासोबतच , जामखेडला नेले अन..

एक खळबळजनक घटना महाराष्ट्रात समोर आलेली असून संसार मोडण्याची धमकी देत एका महिलेला नगर जिल्ह्यातील जामखेड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. एक ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीला आलेली असून बीड तालुका पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही बीड तालुक्यातील रहिवासी असून ऊसतोडीचे काम करते. तिच्या पतीसोबत ती सातारा जिल्ह्यात गेलेली असताना तिथे गेवराई तालुक्यातील एक कुटुंब ऊसतोडीसाठी आले होते या कुटुंबातील महिलेचा भाऊ असलेला राम प्रभू जाधव ( राहणार करझणी तालुका बीड ) हा देखील तिथे आलेला होता यावेळी पीडित महिलेसोबत त्याची ओळख झाली.

दीड महिन्यांपूर्वी ऊस तोडणीचे काम बंद झाल्याने पीडित महिला तिच्या कुटुंबासोबत पुन्हा आपल्या गावी आली त्यानंतर राम प्रभू जाधव हा वेळोवेळी पीडित महिलेला फोन करून तिच्यासोबत बोलत असायचा. महिलेने त्याला अनेकदा बोलण्यास नकार दिला त्यानंतर तुझ्या घरी येऊन तुझा संसार मोडेल असे देखील तो सातत्याने म्हणत होता. 25 जुलै रोजी त्याने दिलेल्या धमकीनंतर मध्यरात्री घरातून त्याने तिला आपल्यासोबत नेले आणि नगर जिल्ह्यातील जामखेड येथे घेऊन जात एका लॉजवर तिच्यासोबत अत्याचार केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावाला घेऊन दुसऱ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. सुमारे पाच दिवस 30 जुलैपर्यंत हा प्रकार सातत्याने तो तिच्यासोबत करत होता.

30 जुलै रोजी तिला पुन्हा बीड येथे सोडून त्याने ‘ जर तू माझ्यावर गुन्हा नोंदवला तर तुला जिवंत सोडणार नाही ‘ अशी धमकी दिली त्यामुळे पीडित महिला ही शांत राहिली आणि पोलिसात जाण्याचे धाडस दाखवले नाही मात्र अखेर तिने १ ऑगस्ट २०२२ रोजी सदर प्रकार महिलेने आपल्या आईच्या कानावर घातला आणि त्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून तक्रार दाखल होताच आरोपी फरार झालेला आहे.