नगर ब्रेकिंग..’ त्या ‘ घडलेल्या घटनेवर कर्जतकर म्हणतात की…

नगर जिल्ह्यातील कर्जत शहरात कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण झालेला नाही. झालेला प्रकार हा दोन तरुणांमधील भांडणातून घडलेला असून त्याला बाहेरच्या काही शक्ती जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन समाजात दुही माजवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र कर्जत शहरातील नागरिक हे खपवून घेणार नाहीत. आमच्या शहरातील वाद मिटवण्यासाठी आम्ही आणि पोलीस सक्षम आहोत. बाहेरील व्यक्तींनी इथे लक्ष घालून वातावरण बिघडवू नये असे आवाहन कर्जत नगरपंचायत येथे झालेल्या विविध व्यापारी संघटना, राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि नागरिकांच्या बैठकीतील सांगण्यात आलेले आहे.

कर्जत शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम सध्या माध्यमांमधून केले जात असून चुकीच्या बातम्या काही न्यूज चॅनेल दाखवत आहेत. त्यांनी जमिनीवर प्रत्यक्ष येऊन कर्जतमध्ये कुठे जातीयता दिसतेय हे पहावे उगाच वातावरण गढूळ करू नये अन्यथा आम्हाला याविरुद्ध लढावे लागेल असे यावेळी सांगण्यात आलेले आहे. शहरात कुठलेही तणावाचे वातावरण नाही मात्र अनेक राज्यस्तरीय आणि देश पातळीवरील चॅनल देखील जाणीवपूर्वक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहे असेही सांगण्यात आले आहे.

कर्जत ही ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांची भूमी असून आतापर्यंत कधीही इथे जातिवाद झालेला नाही. झालेली घटना ही दोन तरुणांचे भांडण असून त्याला जाणीवपूर्वक जातीय रंग देण्यात येत आहे त्यामुळे कर्जत शहराचे मोठे नुकसान होणार आहे. कर्जतमधील अशा घटनेला वेगळे रूप देणे योग्य नाही आणि त्यासाठी शहर बंद करणे देखील योग्य नाही असेदेखील व्यापारी व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आलेले आहे.